Posts

Showing posts from 2022

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

Image
सुमीतने 3BHK घर घेतलं, ते पाहून अमितला त्याचं 2BHK घर लगेच लहान वाटू लागलं. विजयाच्या मुलीला 91% टक्के मिळाले, ते कळताच स्नेहाला तिच्या मुलीला मिळालेले 89% कमी वाटू लागले. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं देता येतील. आपण सदैव आपली इतरांशी तुलना करत राहतो. Social comparison नावाची एक सुंदर संकल्पना Social Psychology मध्ये आहे. त्यात दोन लघुसंकल्पना अंतर्भूत आहेत - Upward social comparison आणि Downward social comparison. Upward social comparison मध्ये माणूस त्याच्या मते त्याच्याहून जे अधिक श्रेष्ठ, कर्तृत्ववान, यशस्वी किंवा आनंदी आहेत, त्यांच्याशी तुलना करतो. पण अशी तुलना करणाऱ्यांमध्ये दोन गट येतात. एक गट जो अशी तुलना यशस्वी व्यक्तीकडून अधिकाधिक प्रेरणा मिळावी, यासाठी करतो आणि आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी तत्पर होतो. आणि दुसरा गट मात्र अशी तुलना करून, इतरांचं सुख, आनंद, सुयश, श्रेष्ठता पाहून स्वतःला कमी लेखतो आणि स्वतःला दूषणं लावत बसतो, हताश होतो. Downward social comparison मध्ये माणूस त्याच्या मते जे कनिष्ठ, कमी कर्तृत्ववान, कमी यशस्वी किंवा अयशस्वी, दुःखी आहेत, त्य...