प्रेम म्हणजे ...
मी बहुतेक व्हाट्स ऍपवर वाचलं होत. - एखाद्या गोष्टीवर प्रेम असणं आणि ती निव्वळ आवडणं यात फरक तो काय ? उत्तर होत, जेव्हा तुम्ही झाडावरचं गुलाब तोडता आणि त्याचा वास घेता, तेव्हा तुम्हाला ते आवडलेलं असतं पण जेव्हा तुमचं त्याच्यावर प्रेम असत तेव्हा गुलाबाच्या झाडाला दररोज पाणी घालता. किती सोप्या भाषेत सांगितलं आहे सांगणाऱ्याने. नाही का? मला ही व्याख्या किंवा हे स्पष्टीकरण खरंच खूप भावलं. आपलं जेव्हा खरंच एखाद्यावर प्रेम असतं तेव्हा आपण त्या गोष्टीची किंवा त्या व्यालतीची विशेष काळजी घेतो. तिला जीवापाड जपतो. तिला कोणत्याही गोष्टीमुळे त्रास तर होणार नाही ना, वेदना तर होणार नाही ना यासाठी आपण सतत तत्पर असतो. त्या व्यक्तीसाठी किंवा त्या गोष्टीसाठी काहीही करायला तयार असतो, अगदी कोणताही त्याग. त्या व्यक्तीचा/ गोष्टीचा आपल्याला ध्यास जडलेला असतो. दिवसरात्र आपण फक्त तिचाच विचार करत असतो. तिच्याबद्दल स्वप्नरंजन करत असतो. आपलं भविष्य तिच्याबरोबर रंगवत असतो. पण असं प्रेम आपण कोणावर किंवा कशावर करतो किंवा करायला पाहिजे? असं प्रेम आपण कोणावरही करू शकतो. ...