Posts

Showing posts with the label मराठी चित्रपट

आनंदी गोपाळ - एक संस्कारमय अनुभव

आनंदी गोपाळ - एक संस्कारमय अनुभव मी 'आनंदी गोपाळ' पहावा, असं मला खूप जणांनी सुचवलं होतं. आणि आज मी 'आनंदी गोपाळ' पाहिला. आणि अजूनही मी भारावलेल्या अवस्थेत आहे. चित्रपट पाहताना बरेच विचार मनात घुमत होते असं म्हणणं जरा अतिशयोक्ती ठरेल कारण चित्रपटाचा प्रभावच इतका आहे की चित्रपट पाहताना आपण कोठल्याही विचारचक्रात गुंग व्हावं अशी आपल्याला तो परवानगीच देत नाही पण चित्रपट पाहताना दाटून येतात त्या अनेकविध भावना. तत्कालात स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरणारे गोपाळराव आणि त्यांचं स्वप्न मनाशी बाळगून ते फुलवणार्या, आधी त्यांच्यासाठी आणि मग स्वतःसाठी व देशासाठी, आनंदीबाई. त्यांची ही स्फूर्तिदायक कथा पाहताना ह्या जोडप्याबद्दल मनात अभिमानाच्या अनेक लाटा उसळून गेल्या, ज्या अद्याप थांबलेल्या नाहीत. आनंदीबाई म्हणजे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, हे मला ठाऊक होतं पण ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी गोपाळराव आणि आनंदीबाईंना किती संघर्ष करावा लागला, अंतर्गत आणि बहिर्गत पातळीवर, याची अतिशय समर्पक आणि सुयोग्य प्रकारे जाणीव आज झाली. 'आनंदी गोपाळ' हा केवळ चित्रपट नसून तो एक संस्कारपट आहे कारण