दमलेल्या पालकांची कहाणी........
मध्यंतरी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचं, 'दमलेल्या बाबाची कहाणी तुला' हे गाणं ऐकण्याचा योग आला. या गाण्यात कामाच्या भारामुळे आपल्या मुलीला वेळ न देऊ शकणारया वडिलांच्या मनातली खंत, तळमळ, वेदना उत्कृष्टपणे संगीतकारांनी श्रोत्यांसमोर आणली. खर तर, ही गोष्ट फक्त त्या गाण्यापुरती मर्यादित नाही. आज आपल्या आजूबाजूला आपल्याला असे अनेक आई-बाबा दिसतील ज्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांच्यासोबत चार गोष्टी करण्यासाठीही वेळ नाही. आणि त्यामुळेच आजकालचे बरेच ऑफिस गोईंग स्त्री - पुरुष पालक असमाधानी दिसतात. याच विषयावरचा एक लेख वाचनात आला. ऑफिसला जाणारया पालकांना आपल्या पाल्याकडे हवं तितकं लक्ष आणि वेळ देता येत...