परि अमृतातेही पैजा जिंके...
आज जागतिक मराठी भाषा दिन. सकाळपासून बऱ्याच ग्रुप्सवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. तसाही तो दरवर्षी होतंच असतो. या दिनाची आठवण असते हे पाहून बरं वाटतं पण नंतर खंत वाटून राहते की या दिनाची ही आठवण, मातृभाषा प्रेम फक्त याच दिवसापुरतं मर्यादित राहातं तेव्हा. असं का होतं ? मराठी भाषा दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या इंग्रजीतून शुभेच्छा देणारेही मी पहिले आहेत. असं का बरं होत? आपण आपल्या भाषेचा मान का बरं राखू शकत नाही? अर्थात मराठी भाषेचे अगदीच वाईट दिवस चालले आहेत असं निराशाजनक चित्र मला रंगवायचं नाही. कारण तसं खरंच नाहीये पण मराठीचे चांगले दिवस चालू आहेत असंही मला ठामपणे म्हणता येत नाही. ट्रेनमधून प्रवास करताना दोन मराठी प्रवाशांनासुद्धा चक्क हिंदी किंवा सर्रासपणे इंग्रजीतून बोलताना मी पाहिलं आहे, ऐकलं आहे. बऱ्याच मातांना त्यांच्या २-३ वर्षांच्या मुलांशी इंग्रजीतून बोलताना मी ऐकलं आहे. मी इंग्रजी बोलण्याच्या विरोधात नाही. इंग्रजी आलंच पाहिजे. कारण ती आज जागतिक आणि ज्ञानभाषा आहे. त्यामुळे आपलं इंग्रजी पक्क असणं नितांत गरजेचं आहे. इंग्रजी बोललंच पाहिजे पण ते आपल्