कान्हा!
कृष्ण या 'शक्ती'बद्दल आणि भगवद्गीतेबद्दल माझ्या मनात विशेष आणि तीव्र कुतुहूल किंवा जिज्ञासा पाच-सहा वर्षांपूर्वी एका भाषणानिमित्ताने निर्माण झाली. लहानपणी 'श्रीकृष्ण' आणि 'महाभारत' मी पाहिलं आहे, अगदी आवडीने पाहिलं आहे आणि तेव्हाही कृष्णाबद्दल एक सकारात्मक प्रतिमा माझ्या मनात होती पण आता माझ्या मनात असलेली कृष्णाची प्रतिमा तुलनेने अधिक खोल, व्यापक आणि ठळक आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी मला एके ठिकाणी एक भाषण करायचं होतं आणि त्यासाठी मी 'भगवद्गीता आणि मानसशास्त्र (Psychology)' हा विषय निवडला. त्यानिमित्ताने ऑनलाईन उपलब्ध असणारे काही लेख मी वाचले. जगभरातून विविध अभ्यासकांनी कृष्णावर, भगवद्गीतेवर आणि आणि त्याचा मानसशास्त्राशी कसा संबंध आहे यावर कमालीचा अभ्यास केला आहे. मी वाचलेल्या एका लेखात, कुरुक्षेत्रावर सर्व शस्त्रं खाली टाकून निराश झालेला अर्जुन म्हणजे आताच्या भाषेत कसा depressed होता आणि त्याला युद्धासाठी तयार करणारा, प्रोत्साहन आणि उर्जा देणारा कृष्ण, याच्यात आणि आजच्या समुपदेशकांत (Therapists/counsellors) कसं साधर्म्य आहे, यावर भाष्य केलं होतं. कृष्णान