Posts

Showing posts from September 9, 2018

माणूस आणि संगणकीकरण...

मला अजूनही आठवतो तो दिवस, ज्या दिवशी मी माझी पहिली कविता केली होती. ती निसर्गावर होती. आणि तेव्हापासून माझा कागद आणि पेनासोबतचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत चालू आहे आणि पुढेही राहील. सुरुवातीच्या  दिवसांमध्ये मी वही किंवा डायरीतच लिहायचे. अजूनही अधून मधून लिहिते - अधूनमधून. कारण -आजकाल बऱ्याचदा संगणकावरच लिहिणं होतं - सॉरी, टाईप करणं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा संगणकावर टाईप करायला सुरुवात केली तेव्हा मला फार गोंधळून जायला व्हायचं. म्हणजे कीपॅडवर ए नंतर बी का नसतो, एस का असतो, असे बालसुलभ प्रश्न मला पडायचे. पण हळूहळू कीपॅडशी दोस्ती झाली आणि लेखन ते टायपिंगचा प्रवास सुरू झाला. पण तरीही कागदावर लिहायची गंमत काही औरच, नाही का? आज आपल्याला संगणकावर पटापट टाईप करता येतं. नको ते खाडाखोडीशिवाय पुसून टाकता येतं. सॉरी, डिलीट करता येतं. हवं तेव्हा त्यात सुधारणा करता येतात. असंच काहीसं पुस्तकांचंसुद्धा. आपण आपल्या लहानपणी पुस्तकं वाचायचो.  म्हणजे आजही वाचतो. पण आज पुस्तक वाचनापेक्षा ऑनलाईन पुस्तकं, लेख, कथा, कादंबऱ्या  वाचणं आणि लेखकाला समोरासमोर अभिप्राय देण्याऐवजी सोशल म...