मलाही काही बोलायचंय..................
१३ जुलै ,२०११, बुधवार. मी आणि माझी मैत्रीण - प्रज्ञा आम्ही अंधेरीला सहजच शॉपिंगसाठी म्हणून गेलो होतो.प्रज्ञा तिला आवडलेला टी शर्ट पहाण्यात व्यस्त होती. मीही तिला थोडीफार मदत करत होते. तितक्यात आम्ही ज्या दुकानात खरेदी करत होतो तिथल्या दुकानदाराला बाजूच्याच दुकानदाराने येऊन सांगितले की " अरे यार कहीपे तो बोंब फुटा है रे.अभी मुझे फोन आय था.नसीब अच्छा जो यहा नही हुआ.पट नही क्या होगा? " माझ्या कानांनी ही गोष्ट पटकन ऐकली. तो मनुष्य ही एवढी गंभीर गोष्ट अगदी मस्त हसत सांगत होता.त्याच्या चेहऱ्यावर जराही कसलं करूण भाव नव्हते वा कसलं गांभीर्य नव्हत.मला थोड आश्चर्य वाटलं. मी आणि प्रज्ञा काहीच न विचारता तिथून निघालो. दोघीनीही असाच ग्रह बांधला की तो मनुष्य असाच काहीतरी बरळत असेल. कारण ही बातमी खरी असती तर त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता दिसली असती ( अशा संवेदनशील परिस्थिती...