अपेक्षा...
गौतम बुद्धानेही म्हणून ठेवलेलच आहे - 'अपेक्षा हे सर्व दुःखांचं मूळ आहे'. या विभूतीने जे म्हटलंय ते जर आजच्या काळात आपणा पामरांना कळलं तर आयुष्य किती सुसह्य होईल? आपण माणसे खूप अपेक्षा करतो आणि तेही बऱ्याचदा इतरांकडून, दैवाकडून आणि देवाकडूनही. अपेक्षांमध्ये गुरफटणे हा पिढयानपिढया अव्याहत चालत आलेला मानवी स्वभाव आहे, वृत्ती आहे. ही केवळ जेव्हा वृत्ती असते तोपर्यंत ठीक असत पण जेव्हा ही वृत्ती विकृतीत परिवर्तित होते तेव्हा मात्र सगळी गणित बिघडायला सुरुवात होते. आता तुम्ही म्हणाल की," माणूस म्हटला की अपेक्षा ह्या आल्याच. अपेक्षा नाही तो माणूस कसला?" मी स्वतः काही अपेक्षा बाळगण्याच्या विरोधात नाही, पण त्या कोणाकडून, कितपत आणि केवढ्या बाळगाव्या याबाबत माझी स्वतःची अशी मी काही धारणा आहे. मला असं राहून राहून वाटतं की आपण अपेक्षा ह्या इतरांकडून न करता (किंवा कमी करता) त्या स्वतः कडून कराव्यात आणि योग्य वेळी, योग्य तितक्या प्रमाणात व योग्य त्या बाबतीत कराव्यात. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला दुःख होत आणि आपली प्रतिक्रियाही दूषित होऊन जाते. मुळात माणसांमध्ये वादच हो...