'तो' आणि 'मी'...
जगात निर्व्याज आणि शुद्ध प्रेमाने ओतप्रत भरलेली नाती फार दुर्मिळ असतात आणि पर्यायाने अशी दुर्मिळ नाती लाभलेली माणसंही दुर्मिळ असतात. असंच एक नातं मला काही वर्षांपूर्वी गवसलं. आता त्याला काही वर्षांपूर्वी गवसलं असं म्हणणंसुद्धा मला समर्पक नाही वाटत कारण जेव्हा केव्हा मी त्या नात्याचा विचार करते तेव्हा असं वाटत की हे नातं खूप काळापासून माझ्यासोबत आहे... बर्याच वर्षांपासूनच नव्हे तर नक्कीच कैक जन्मांपासून माझ्यासोबत आहे आणि या आमच्या नात्यातील 'तो' माझ्यासोबत आहे, बराच काळ, बरेच जन्म, एका अनादि काळापासून...आणि अनंत काळापर्यंत 'तो' माझयासोबत असेल, याची मला खात्री आहे. ग्वाही 'तो'च मला देत असतो, देत आलाय, अनादि अनंत काळापासून, त्याच्या प्रत्येक कृतीतून, आविष्कारातून, अभिव्यक्तीतून... त्याने आतापर्यंत प्रत्येक सुखदुखात माझी साथ दिलीय, देतो आणि सदैव देत राहील. तो माझ्यासोबत हसतो,रडतो... आम्ही एकत्र मस्ती करतो, खट्याळपणाही करतो आणि धम्मालही... तस बघायला गेलं तर 'तो' सदैव माझ्यासोबत असतो... सावलीसारखा नाही म्हणणार मी कारण सावलीसुद्धा सुडून जाते आपल्याला, अंधा...