मलाही काही बोलायचंय..................
१३ जुलै ,२०११, बुधवार. मी आणि माझी मैत्रीण - प्रज्ञा आम्ही अंधेरीला सहजच शॉपिंगसाठी म्हणून गेलो होतो.प्रज्ञा तिला आवडलेला टी शर्ट पहाण्यात व्यस्त होती. मीही तिला थोडीफार मदत करत होते. तितक्यात आम्ही ज्या दुकानात खरेदी करत होतो तिथल्या दुकानदाराला बाजूच्याच दुकानदाराने येऊन सांगितले की " अरे यार कहीपे तो बोंब फुटा है रे.अभी मुझे फोन आय था.नसीब अच्छा जो यहा नही हुआ.पट नही क्या होगा? " माझ्या कानांनी ही गोष्ट पटकन ऐकली. तो मनुष्य ही एवढी गंभीर गोष्ट अगदी मस्त हसत सांगत होता.त्याच्या चेहऱ्यावर जराही कसलं करूण भाव नव्हते वा कसलं गांभीर्य नव्हत.मला थोड आश्चर्य वाटलं. मी आणि प्रज्ञा काहीच न विचारता तिथून निघालो. दोघीनीही असाच ग्रह बांधला की तो मनुष्य असाच काहीतरी बरळत असेल. कारण ही बातमी खरी असती तर त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता दिसली असती ( अशा संवेदनशील परिस्थितीत टी दिसावी अशी एक माफक अपेक्षा आपण करतो, एक संवेदनशील माणूस म्हणून ) किंवा घरून कोणाचातरी किंवा मित्र- मैत्रिणींपैकी कोणाचातरी फोन किंवा संदेश आला असता पण या दोहोंपैकी काहीचं घडल नव्हत. त्यामुळे आम्ही आपल्या चाललो. थोडं पुढपर्यंत आल्यानंतर आम्हाला आमच्या एका मैत्रिणीचा संदेश आला की, मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत तर बाहेर असाल तर लवकरात लवकर घरे पोहचा.हा संदेश वाचल्यानंतर कळून चुकल आम्हाला की तो दुकानदार जे काही बोलला ते सर्व खर होत. मग इतकी गंभीर गोष्ट त्याने दात विचकत का बरे सांगितली असेल??????त्याला काहीच वाटलं नसेल ही गोष्ट इतक्या lightly सांगताना? Yes here we are .........
दर महिन्याला पौर्णिमा,अमावास्या येतात तशाच देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपरयातून कोठेकोठे दहशतवादी हल्ले किंवा बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या आपल्या कानांवर येऊन अक्षरशः आदळत असतात.नंतर दोन - तीन दिवस सर्व वातावरण गंभीर. आपणही छानपैकी चहाचा कप हातात घेऊन या सर्व प्रकारचे चित्रीकरण मस्त टकमक डोळ्यांनी लाईव्ह पहात असतो.खर तर आपल्याला आजकाल अराजकतेची सवयच झालेली आहे. कारण आपणही हे सर्व संवेदानाहीणपणे पहात असतो वा दुसरया दिवशी त्या वांझ गप्पा करत कॉलेज आणि ऑफिसही गाठतो. हे झाली आपल्यासारख्या सामान्य माणसांचे. सरकारचे तर वेगळेच. यांचे घोडे आपले नेहमी वरातीमागूनच धावायचे. नंतर मृतांच्या आणि जखमीनच्या नातेवाईकना लाखोंचे packages देण्यापेक्षा तीच रक्कम आपले निर्लज्ज सरकार आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या सुसज्जतेसाठी का नाही वापरू शकत? जेथे १०-१२ दहशतवादी मुंबईच्या समुद्राकिनार्याद्वारे मुंबईत घुसतात आणि त्यांच्या एके - ४७ ने आपली माणसे आणि पोलीसही टिपतात आणि आपण मात्र सध्या revolver guns ने आणि लाकडी लाठ्यांनी त्यांचा सामना कारतो.यात काय अर्थ आहे?????????? लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला मानल आहे अशी आपली प्रसारमाध्याम याचं तर त्याहून वेगळ काहीतरी चालू असतं. प्रत्येक गोष्ट ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली नको तितकी रंगवून सांगण्यात, दाखवण्यात आणि ती जनतेपर्यंत पोहोचवण्यात भारतीय प्रसारमाध्यमांचा हात कोणीही धरू शकत नाही. आज खर सांगायचं तर Media Censorship ची नितांत गरज आहे.
आज दहशतवादाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.असं म्हणतात की, दहशतवादाला जात,धर्म,पंथ,वर्ण,वेश नसतो. दहशतवाद हा काही फक्त भाषण ठोकून किंवा मी काय किंवा आपण सर्वांनी काय असे जळजळीत आग ओकणारे लेख लिहून किंवा ते फक्त वाचून,इतर राष्ट्रांची केवळ बोलाचाली करून किंवा हल्ले झाल्यानंतर मेकअप केलेल्या आणि लिपस्टिक लावलेल्या चेहर्यासह दिलेल्या श्रद्धांजलीनी संपण्यातला नाही आणि राजकारण्यांच्या राजीनाम्यानी तर मुळीच मुली संपण्याताला नाही.
दहशतवाद रोखण्यासाठी मला काही उपाय सुचवावेसे वाटतात ...............
१. लहानपणापासूनच मुलाना एक हिंदू,मुसलमान,ख्रिश्चन ,शीख म्हणून न वाढवता त्याना एक भारतीय म्हणून वाधवान.त्यांच्यात राष्ट्रधर्म रुजला आणि वाढला पाहिजे.अशी मुळे उद्या भविष्यात नक्कीच वेळप्रसंगी देशाच्या सुरक्षेसाठी उभी राहू शकतात वा आपापल्या क्षेत्राद्वारे देशासाठी काहीतरी करू शकतात. देशाबद्दल मुळात निष्ठा असण हे महत्वाचं.
२. सुरक्षा समित्यांची स्थापना - अशा समितीमधून स्वेच्छेने, निरपेक्ष भावनेने देशाच्या संरक्षणासाठी पुधी आलेल्या तरूणांचा समावेश असेल;अशा तरूणांना ओळखपत्रे देऊन त्याना शस्त्रास्त्रांचे योग्य ते शिक्षण डीएल जावे जेणेकरून भविष्यात जर एखाद्या हल्ल्यात एखादा आपला जवान किंवा पोलीस जखमी अथवा जायबंदी झाला तर याची जागा हा नवीन प्रशिक्षक घेईल घेईल. अशा अप्रकारे आपण आपली प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी सिविल आर्मी तयार करू शकतो, जी वेळप्रसंगी मदतीला येईल.
३. जनता आणि सरकार यांच्यात विश्वास आणि सुसंवादाचे संबंध असणे.२६/११ चे उदाहरण घेऊयात. दहशतवादी मुंबईत हैदोस घालत असताना सरकारी अधिकार्यांनी, मंत्र्यांनी मंत्रालाय जर ते तीनही दिवस चालू ठेवले असते आणि सर्व सूत्रे जर मंत्रालयातून हलवली असती तर कदाचित ६० तसं चाललेली ती चकमक, झुंज आटोक्यात आणता आली असती. कारण जनता ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ही केवळ एक जाणीवच खर तर दहशतवादाची कंबर मोडण्यास पुरेशी आहे.
४. अजून एक उपाय. उपाय म्हणण्यापेक्षा धोरणच......दहशतवादाशी चाललेल्या या लधाईत कोणी इतर राष्ट्र आपली मदत करतील या आशेवर न रहाता आपण स्वताहून हातपाय हलवायला हवेत.अमेरिकेसारख्या राष्ट्राचे दहशतवादासंबंधी जे काही अनुभव आहेत, त्यांचा तसेच इतरही राष्ट्रांनी दहशतवादावर मात करण्यासाठी कोणते उपाय योजण्यास सुरवात केली आहे यांचा अभ्यास करून ताबडतोब काही ठोस पावले उचलायला हवीत.दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानही विकसित करायला हवे. उदाहरण द्यायचेच झालं तर रोनाल्ड रेगन यांच्या काळातील बहुचर्चित star war चा कार्यक्रम विकसित करण्यात आला, त्यात अण्वस्त्रे हवेतच निष्प्रभ करण्याचे तंत्र वापरण्यात आले होते, असे काही शोध लावायला हवेत.
५. तसेच, आपल्या समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीतली हलगर्जी जिचा आपली सर्वांनाच २६/११ ला फटका बसला बसलेला आहे. त्यातूनही आपल्या सरकारने काही बोध घायला हवा.
६.पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रात्रे आणि बुलेटप्रूफ जाकेट्स उपलब्ध करून द्यावीत. हे सर्वात महत्वाचे आहे.....................
७.खाजगी उद्योग क्षेत्र आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद वा त्यांचे संयुक्त प्रयत्न - आपापल्या क्षेत्रातील वैयक्तिक आणि सामुहिक सुरक्षा व्यवस्था हे जरी खाजगी कंपन्यांचे प्राथमिक कर्तव्य असले तरीही शासकीय सुरक्षा यंत्रणांनाही त्यांनी मार्गदर्शन आणि सहाय्य करणे अशी एक अपेक्षा आहे. कंपन्यांनी आपापल्या वास्तू आणि वस्तू, कर्मचारी,अतिथी, आपल्या आस्थापनाचे क्षेत्र तसेन आपल्या क्षेत्रांतर्गत येणार परिसर तसेच काही संवेदनशील जागांचा वेलोवेले आढावा घ्यावा. पोलीस यंत्रणांच्या सहाय्याने, समन्वयाने , सल्लामसलत करून प्रतिबंध आणि प्रतिकार यासाठी कृती आराखडा तयार करावा. तो निर्धारित करून त्यांची रंगीत तालीम घ्यावी.या यंत्रणेला सुसज्ज ठेवावे. अशा simulated परिस्थितीत घेतलेल्या तालमी ऐनवेळी नक्कीच उपयोगी पडू शकतात.
आणि
८ . 'लंडन फर्स्ट' या कार्यक्रमच्या धर्तीवर आपल्याकडेही 'इंडिया फर्स्ट' असं कार्यक्रम सुरु झाला पाहिजे. ज्यात सर्वात आधी फक्त भारताचा,भारताच्या सुरक्षिततेचा,भारतच्या उज्ज्वल आणि समृद्ध भाविष्याचाच विचार आणि त्यासंबंधीच्या तरतूदी अपेक्षित आहेत.
Comments
Post a Comment