अपेक्षा...
गौतम बुद्धानेही म्हणून ठेवलेलच आहे - 'अपेक्षा हे सर्व दुःखांचं मूळ आहे'. या विभूतीने जे म्हटलंय ते जर आजच्या काळात आपणा पामरांना कळलं तर आयुष्य किती सुसह्य होईल?
आपण माणसे खूप अपेक्षा करतो आणि तेही बऱ्याचदा इतरांकडून, दैवाकडून आणि देवाकडूनही. अपेक्षांमध्ये गुरफटणे हा पिढयानपिढया अव्याहत चालत आलेला मानवी स्वभाव आहे, वृत्ती आहे. ही केवळ जेव्हा वृत्ती असते तोपर्यंत ठीक असत पण जेव्हा ही वृत्ती विकृतीत परिवर्तित होते तेव्हा मात्र सगळी गणित बिघडायला सुरुवात होते. आता तुम्ही म्हणाल की," माणूस म्हटला की अपेक्षा ह्या आल्याच. अपेक्षा नाही तो माणूस कसला?" मी स्वतः काही अपेक्षा बाळगण्याच्या विरोधात नाही, पण त्या कोणाकडून, कितपत आणि केवढ्या बाळगाव्या याबाबत माझी स्वतःची अशी मी काही धारणा आहे. मला असं राहून राहून वाटतं की आपण अपेक्षा ह्या इतरांकडून न करता (किंवा कमी करता) त्या स्वतः कडून कराव्यात आणि योग्य वेळी, योग्य तितक्या प्रमाणात व योग्य त्या बाबतीत कराव्यात.
अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला दुःख होत आणि आपली प्रतिक्रियाही दूषित होऊन जाते. मुळात माणसांमध्ये वादच होतात ते अपेक्षाभंगांमुळे. जरा बारकाईने आजूबाजूला पाहिलत की माझं विधान नक्की पटेल. उदाहरणार्थ, आई वडिलांना वाटत असत की त्यांच्या मुलाने/मुलीने विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यायला हवा (कारण इतरजण त्या शाखेची बऱ्याचदा वाहवा करतात) आणि तो जर नाही घेतला किंवा नाही घ्यायचं ठरवलं की आई वडिलांच्या अपेक्षा लगेच दुखावतात आणि ते आपल्या मुलांवर डाफरतात. घरच्यांना वाटत असत की आपल्या मुलाने / मुलीने मी सांगेन त्याच मुलीशी/ मुलाशी लग्न केलं पाहिजे. ते नाही केलं किंवा स्वतः च्या आवडत्या मुली/मुलाशी केलं की लगेच आपल्याकडे भावनिक नाट्य (Emotional drama) चालू होतात. सासू सासर्याना वाटत की आमच्या सुनबाईनी जीन्स आणि टीशर्ट घालू नये आणि ते जर का तिने घातलं की घरात वाजलच म्हणून समजा.प्रियकरांना वाटतं की त्यांच्या प्रेयसीने दुसर्या कोणत्या मुलाशी जास्त बोलू नये आणि अर्थात असं प्रेयसीनाही वाटतं की त्यांच्या प्रियकराने इतर कोणत्याही मुलीसोबत जास्त वेळ घालवू नये. आणि असं जर का घडलं की दोघान्मध्ये वादंग निर्माण व्हायला चालू होतात. ही मी फार कमी उदाहरणं दिली. पण मला खात्री आहे की अशा प्रकारची अनेक उदाहरणं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असतील. माणसं अशाच प्रकारच्या काही अपेक्षा इतरांकडून करताना तुम्हाला दिसत असतील. इतरांकडे कशाला जा? आपल्याकडूनही अशा आणि इतर प्रकारच्या अनेक अपेक्षा आजूबाजूची लोक करत असतील आणि आपणही इतरांकाडून अशा प्रकारच्या अपेक्षा करत असू. असू काय, करतोच. आणि त्या जर का पूर्ण नाही झाल्या की आपल्या अंगाचा तिळपापड होतो. माझाही झालाय. तुमचाही झालाय. आणि आपल्या सर्वांना कळत असत की आपण अपेक्षा ठेवल्याने आपल्याला वारंवार दुःखाला बळी पडाव लागतंय. मग तरीही आपण अपेक्षा करतोच कशाला? हा प्रश्न आतापर्यंत कोणा संशोधकाने, तत्वज्ञाने किंवा मानसशास्त्रज्ञाने अभ्यासाला आहे का, मला कल्पना नाही. पण आपण माणसे अपेक्षा करतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि त्याने दुखी होतो हे दुसरं त्रिकालाबाधित सत्य आहे.
पण मग आपण माणसे अवाजवी आणि अवास्तविक अपेक्षा करतोच कशाला स्वतःकडून, इतरांकडून, दैवाकडून आणि देवाकडून? मला असं वाटतं की माणूस इतरांकडून अपेक्षा तेव्हा करतो जेव्हा तो स्वतः पूर्ण करण्यास असमर्थ (खरोखरीचा किंवा काल्पनिक पातळीवर), निष्क्रिय किंवा आळशी असतो आणि जेव्हा त्याचा स्वतःवर विश्वास नसतो. उदाहरणार्थ, मुलांना किंवा अगदी नवर्यालाही असं वाटत असत की आपल्या आईने किंवा बायकोने आपल्याला दररोज जेवण बनवून द्यावं. हे असं का वाटत असत? कारण मुलं आणि नवरा खरोखरीच किंवा काल्पनिक पातळीवर जेवण बनविण्यास असमर्थ असतात. म्हणून ते घरातील कर्त्या स्रीकडून जेवण बनवून मिळण्याची अपेक्षा करतात. आता दुसरं कारण ज्यामुळे माणूस दुसऱयांकडून अपेक्षा करतो. आपण जेवणाचच उदाहरण घेऊयात. घरात लहान मुले, नवरा किंवा इतर पुरुष जे खरोखरीच किंवा काल्पनिक पातळीवर जेवण बनविण्यास असमर्थ आहेत म्हणून ते कर्त्या स्त्रीकडून जेवण बनविण्याची अपेक्षा करतात. पण घरात समजा कर्त्या स्त्रीची सासूही असेल तर ती जेवण बनविण्यास समर्थ असूनही ( कारण तिला कैक वर्षांचा जेवण बनविण्याचा अनुभव असतो.) स्वयंपाक आपल्या सुनबाईनीच करावा अशी अपेक्षा करते. याच कारण 'परावलंबन' किंवा 'असमर्थता' हे बहुधा कमी असून ते पुरुषप्रधान संस्कृतीचं अपत्य असत. बव्हंशी सासवांना आपल्या मुलाच्या लग्नानंतर स्वयंपाक आपल्या सुनबाईनीच करावा अशी अजूनही अपेक्षा असते. (अर्थात सुनांनी स्वयंपाक करूच नये, अस माझं मत नक्कीच नाहीये पण त्यांनी'च' स्वयंपाक करावा असही मला नाही वाटत.) या दोन उदाहरणांवरून आपल्याला स्पष्ट होईल की अपेक्षा आपण तेव्हाच ठेवतो जेव्हा आपण एखादी कृती करण्यास खरोखरीच किंवा काल्पनिक पातळीवर असमर्थ असतो किंवा तशा अपेक्षा इतरांकडून करण हे परंपरागतपणे अव्याहतपणे चालत आलेली समाजमनाची वृत्ती असते (अनेक कारणांमुळे). अजून एक कारण असू शकत आणि ते म्हणजे आपलयाला समोरच्या व्यक्तीबाबत एक अधिकारभावना असते. अधिकारभावना म्हणजे, 'मला असं वाटत आहे ना की ह्या व्यक्तीने हे केलं पाहिजे मग तिने ते केलच पाहिजे. ती व्यक्ती माझी अमुक अमुक लागते. आणि अमुक अमुक लागणाऱ्या इतर व्यक्ती असच करतात म्हणून हिनेही असच केलं पाहिजे, अशी माणसांची धारणा असते आणि त्यातून अपेक्षांची साखळी निर्माण होते आणि त्या अपूर्ण नाही झाल्या की आपला अहं दुखावतो आणि परिणामतः आपण दुखी होतो.
मग आता आपल्याला प्रश्न पडेल की अपेक्षा कशा थांबवाव्यात किंवा कमी कराव्यात (मानवी अपेक्षा पूर्णपणे थांबवता येतील हीही मुळात एक अवास्तविक अपेक्षा वाटते, नाही का?) मला असं वाटत की आपण स्वतःकडून अपेक्षा करण्यास सुरुवात करावी. समोरचा माणूस माझ्याशी चांगलं वागेल आणि वागलाच पाहिजे असं म्हणण्याआधी आपण स्वतः त्या माणसाशी चान्गले वागून बघितलं पाहिजे. म्हणजे तो माणूस आपोआपच चान्गला वागेल आणि तारेही चांगला नाही वागला तर मग लगेच ते स्वीकारता आलं पाहिजे. मुळात आपण समोरचा माणूस आपल्याशी चांगला वागावा म्हणून आपण त्याच्याशी चांगलं वागण्याच्या फंदात पडणं हे श्रीकृष्णाच्या 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या तत्वाच्या विरोधात आहे. अपेक्षा ना करता सत्कर्म करत राहणं हेच सर्व सुखाचं उगमस्थान असावं असं मला राहून राहून वाटत. कारण या तत्वानुसार चाललं की सगळ्या अपेक्षा गळून पडतात आणि उद्धाराचा मार्ग गवसतो. दुसरा एक मार्ग इतरांकडून अपेक्षा थांबविण्याचा आणि तो म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीशी स्वतः शी किंवा अजून इतर कोणाशी तुलना करण थांबवलं पाहिजे. उदाहरणार्थ, शाळेत असतानाच मला भूगोल आवडायचं म्हणून माझ्या मुलालाही भूगोल आवडायला हवं किंवा शेजारणीच्या मुलाला भूगोलात चांगले गुण मिळतात म्हणून माझ्यातही मुलाला भूगोलात चांगले गुण मिळायला हवेत, अशी तुलनेवर आधारित अपेक्षा करान सोडून द्यायला हवं. आपलं मूल म्हणजे एक स्वतंत्र दैवी अविष्कार आहे आणि त्यामुळे त्याच व्यक्तिमत्व,स्वभाव आणि मन ह्या आपल्याहून किंवा इतरांहून भिन्न असू शकतात आणि बऱ्याचदा त्या भिन्नच असतात, हे समजून घेणं आणि ते स्वीकारणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा एक मार्ग अपेक्षा थांबविण्याचा आणि तो म्हणजे आपल्या अपेक्षा इच्छांमध्ये रूपांतरित करणं. म्हणजे काय, तर ' माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलाने खूप शिकून अर्थशास्त्रज्ञ हवं पण जर त्याची इच्छा नसेल आणि त्याला इतर काही व्हायचं असेल तर ते तो/ती मोकळेपणाने करू शकतो/शकते.", असा विचार करणं. इच्छा पूर्ण नाही झाल्या की एवढं दुःख नाही होत जेवढं अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की होत.
So we have to convert 'shoulds' and 'musts' into 'wants'.
जो माणूस इतरांकडून आणि स्वतः कडून कमी अपेक्षा करतो किंवा वास्तविक आणि वाजवी अपेक्षा करतो आणि अवास्तविक किंवा अवाजवी अपेक्षा करत नाही तो माणूस भावनिक आणि वैचारिक स्वातंत्र्य अनुभवतो. त्या माणसाला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. आणि असा माणूस खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं खरं ध्येय शोधून काढू शकतो आणि ते गाठू शकतो.
मग काय आपण अपेक्षा कमी करायला घेतोय ना? or now am I expecting too much?
काळजी घ्या.
दीप्ती शा. आ. शिंदे.

Comments
Post a Comment