एक विचारपूर्ण प्रवास.............
सकाळची साधारण पावणेसातची वेळ.व्ही.टी स्टेशनवर हमालांचा,प्रवाशांचा,तिकीट तपासणारया टी.सीन्चां नुसता गलबलाट चालू होता.मडगाव एक्स्प्रेस निघून जाऊ नये म्हणून मी आणि आई आम्ही झपझप चालत होतो.आदल्याच दिवशी माझी लास्ट ईयर ची परीक्षा संपल्याने आम्ही गावी जात होतो.गावाला जाताना एक वेगळाच आनंद मनात असतो.
आम्ही धावत होतो.तिकीट आयत्या वेळी काढले असल्याने मी आणि आई आम्ही जनरलच्या डब्ब्यात चढणार होतो.आम्ही कशाबशा आत चढलो.बघतो तो काय,आधीच सर्व सीट्स फुल्ल झाल्या होत्या.माझ्या कपाळावर जरा आठ्याच पडल्या.मग मी बसण्यासाठी दुसरा पर्याय शोधू लागले.मुख्य आसनाच्या वर लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये काही फळ्या ठोकलेल्या असतात,ज्याचाही बसण्यासाठी वापर केला जातो.मी आईला त्यावर बसायला सांगितले आणी मी खाली उभी राहिले.आता उभं राहून करायचं काय?तितक्यात handbag मध्ये असलेल्या 'Wise & Otherwise' ची मला आठवण झाली.तितक्यात गाडी सुटली.गाडी ठीक वेळेवर सुटली म्हणून मला जरा हायसं वाटलं.
छान हवा येत होती.जरा थंड वाटू लागलं होत.बायकांच्या एवढ्या गराड्यात,जागेसाठी चाललेल्या त्यांच्या भांडणात मला नकोसं झालं होत. पण ठीक आहे.निदान पुस्तक तरी हातात होत.ते वाचण्यात छान वेळ जात होता.
एक दीड तासांतच ठाणे स्टेशन आलं.ठाण्याला गाडी थांबताच फेरीवाल्यांचा आवाज येण चालू झालं.भेळवाला,वडापाववाला,कटलेट्वाला इत्यादीन्चा कलकलाट चालू झाला.सकाळपासून काहीही खाल्लेलं नसल्याने मला प्रचंड भूक लागली होती.आईला विचारून मी भेळ घेतली.चक्क बाहेरच खायला आईने हिरवा कंदील दाखवला,म्हणून खूष झाले होते.
माझ्यासमोरच दादरला चढलेल्या एक बाई होत्या.त्यांनीही भेळ घेतली.कुणी वडापाव घेतला.कुणी काही नि कुणी काही.तितक्यात माझी नजर समोरच बसलेल्या एका मध्यमवयीन बाईवर जाउन स्थिरावली.त्या बाईने हातातली भेळ संपवून त्या भेळेचा कागद चुरगळला.त्याचा चेंडू केला.आणि तो चेंडू त्या बाईने तोंड हलवत बाहेर फेकून दिला,अगदी निर्विकार चेहऱ्याने.आणि मी नुसती पहात राहिले,कारण तिच्या या एकंदर कृत्याचा मला पूर्णपणे उलगडा होईपर्यंत तिने तो चेंडू कोठल्याकोठे भिरकावून दिला होता.मग तर मला तेच दृश्य पुन्हा पुन्हा चहुबाजूनी घडताना दिसलं.ज्यांनी-ज्यांनी खायला वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला घेतले होते,त्यांनी खाद्यापदार्थान्च्या वेष्टणाच्या पुरचुंड्या करून खिडकीबाहेर फेकून दिल्या होत्या.
क्षणभर माझ्या मनात एक विचार येउन गेला के एहीच ट्रेन जर का जपान किंवा जर्मनीतल्या रुळांवरून धावत असती तर अगदी विरुद्ध चित्र पहायला मिळाले असते. परदेशातील माणसे आपल्या खाजगी मालमत्तेइतकीच सार्वजनिक मालमत्तेचीही काळजे घेतात.आणि आपल्याकडे मात्र असे काहीच दिसून येत नाहे.याला फक्त राजकीय इच्छ्शक्तीच नाही तर आपणही एक नागरिक म्हणून जबाबदार आहोत.पण असं का?आपल्याला का बरे वाटू नये की आपणही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी?
हाच विचार कमी की काय तोच माझं लक्ष समोरच बसलेल्या आई-मुलीच्या एका जोडगोळीने वेधून घेतलं.त्या बाईनी त्यांच्या मुलीच्या हट्टावरून तिला पर्समधल्या चौकोनी कागदाचा एक तुकडा काढून दिला.त्या मुलीने तिच्या आईसमोर त्या कागदी तुकड्याचे अनेक तुकडे करून ते गाडीतच भिरकावून दिले आणि टाळ्या वाजवत हसू लागली.तिची आई तिला काहीच बोलली नाही.
माझ्या मनातले विचार मात्र अधिकच तीव्र झाले............................................
mi pan 10th paryant ase kagad bhirkavaycho...aai baba ordayche,pan tyacha farsa kadhich parinam navta zala..1 diwas mala ch konitari sangitla ki jar tula parprantiyanni ithe yeun ghan keleli awdat nahi..tu ragavtos..
ReplyDeletemag tu tuzyach rajjyat rahun tyanhun konti wegli kruti kartoys???
tithpasun ajtagayat mi mala tasa vagu dila nahi...n te 1 vakkya ayushyabharasthi purun urla..
Hm...........Good Rajas...........
ReplyDelete