शिकूया मिळून सार्याजणी...
आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जवळजवळ सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. आज तिने यशाची बव्हंशी क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. पण अशा किती स्त्रिया आहेत? अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोग्या... स्त्री शिक्षणाचे आणि सक्षमीकरणाचे वारे अजूनही फक्त मुंबई, पुण्यासार्ख्याच कॉस्मॉपॉलिटन शहरांत वाहत आहेत. खेड्यातील स्त्री आजही अशिक्षित आहे... खेड तर दूर पण शहरान्मधीलही बर्याच स्त्रिया अजूनही रुढी, परंपरांच्या बंधनात अडकलेल्या आहेत. त्याच्यातून त्यानी स्वतःची सुटका करून घेण खूप गरजेच आहे.
आजही कित्येक मुलीना शिक्षण मिळत नाही. त्याना शिक्षणाच्या त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहाव लागत. कित्येक मुलींची कोवळ्या वयात आजही लग्न होतात. पर्यायाने जबाबदाऱ्या लवकर अंगावर पडतात आणि वैयक्तिक विकास खुंटतो. आणि भारतीय स्त्रियांची जडणघडणही अशी काय चतुराईने केली जाते की त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येतेय हे त्यांच त्यानासुद्धा कळत नाही आणि कळल तर वाईट वाटत नाही. उलट आपण आपल्या घर संसारासाठी त्याग करतोय आणि हे पुण्यकर्म आहे अशी मानसिकता त्यांच्यात रुजवली गेलेली असते.
एवढ लांब कशाला जा? अगदी आम्हा सुशिक्षित मैत्रीणीन्मध्येही अशा अनेकजणी असतील ज्यानाही विविध गोष्टी अजून शिकायच्या आहेत. कोणाला संसाराच्या गोंधळातून अपूर्ण राहिलेल शिक्षण पूर्ण कस करायच ते शिकायच आहे. कोणाला आपले छंद कसे जोपासायचे ते शिकायच आहे. कोणाला समोरच्याला ठामपणे नकार कसा द्यायचा ते शिकायच आहे. कोणाला आत्मसन्मान कसा बाळगायचा ते शिकायच आहे. कोणाला स्वतःवर प्रेम कस करायच ते शिकायच आहे तर कोणाला स्वत्व कस जपायच ते शिकायच आहे... मलाही यातील अजून बरच काही शिकायच आहे. फक्त औपचारिक शिक्षण शिक्षण नाही. चार भींतीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमापलीकडेही एक अभ्यासक्रम आहे आणि जो खूप मह्त्त्वाचा आहे - माणूस म्हणून कस जगायच ह्याचा अभ्यासक्रम... आम्ही फक्त स्त्रिया नाही आहोत... आम्ही माणूसपण आहोत. आम्हाला देवी समजाव न समजाव हा समाजाचा प्रश्न आहे. पण आम्हाला निदान माणूस तरी समजल जाव, ही इच्छा आहे. पण हे केवळ समाजाकडून नाही होणार. आम्हालाही प्रयत्न करावे लागणार आहेत. आम्हालाही बोलाव लागणार आहे. आम्हालाही झगडाव लागणार आहे. खरेखुरे संस्कार आणि अनावश्यक रुढी यातील फरक आम्हाला ओळखायचा आहे. पुरुषसत्ताक पद्धतीच्या सर्व कालाबाह्य आणि मूलभूत मानवी हक्कंची पायमल्ली करणारया तत्वांचा आमच्यावरील प्रभाव मिटवावा लागणार आहे. आम्हालाही बरच काही शिकाव लागणार आहे. तरच समाजाची दोन्ही चाक व्यवस्थित रुळावर येतील आणि तरच समाजप्रवाहाच्या विरोधात जावून आम्हा स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार्या सावित्रीबाई फुलेना योग्य आदरांजली आम्ही देवू शकलो अस आम्हाला म्हणता येइल.
सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... मैत्रीणीनो चला, खूप खूप शिकूयात...
- दिप्ती शा. आ. शिंदे
Comments
Post a Comment