रंगीत काचेची खिडकी...
रॉबिन शर्मा लिखित 'आपली आत्मशक्ती ओळखा' पुस्तक वाचत होते. पुस्तक खूप प्रेरणादायी आणि डोळ्यात अंजन घालणारं आहे, नवीन ज्ञान देणारं आहे, तमाकडून तेजाकडे नेणारं आहे. त्यातील एका प्रकरणाच्या नावाने मला आकर्षित केलं. ते नाव वाचून मला काही अंदाजच बांधता येईना की या प्रकरणात नेमकं काय लिहिलेलं असेल. प्रकरणाचं नाव होत - 'रंगीत काचेची खिडकी'. हे नाव मला खूप आकर्षक वाटलं आणि मी लागलीच ते प्रकरण वाचायला सुरुवात केली. प्रकरणाची मध्यवर्ती कल्पना अशी होती की प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एक रंगीत काचेची खिडकी असते आणि आपल्यापैकी प्रत्येकजण त्या रंगीत काचेच्या खिडकीतूनच जगाकडे पाहात असतो. आपण बर्याचदा जग जसे आहे तसे पाहात नाही तर आपण जसे आहोत तसे जग आपल्याला दिसत असते. किती खर आहे हे, नाही का?
तुम्ही कधी घेतलाय अनुभव याचा? आपण सुखी असलो, आनंदी असलो की जगही आपल्याला सुखी आणि आनंदी दिसत आणि आपण जर दुखी असलो तर जगही आपल्याला दुखी दिसत. आपण आजूबाजूला जे पाहात असतो ते आपल्या आंतरिक घडामोडीचं प्रतिबिंब असत. कोणीतरी म्हटलंच आहे, "सौंदर्य हे ते पाहणाऱ्याच्या नजरेत असत." खर आहे. बर्याचदा वस्तू, गोष्टी, घटना यांना स्वतःचा रंग, रूप,आकार नसतो. तर तो आपण त्यांना बहाल करत असतो, आपल्या विचार, भावना आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर. 'रचनावादी' मानतात की माणूस हा त्याचे अनुभव आणि त्याच्या कल्पना यांच्या अन्योन्यक्रियेद्वारे घटना, गोष्टी आदींचा अर्थ तयार करतो. बर्याचदा आपली एखाद्या व्यक्ती, वस्तू, घटना आदींबाबत असणारी मतं, दृष्टीकोन हे आपण रचलेलेच असतात आणि जे खरे असूही शकतात किंवा नसूही शकतात. आपल्याला एखादी भांडकुदळ वाटणारी व्यक्ती मनाने कदाचित खूप प्रेमळ आणि जुळवून घेणारी असू शकते. आपण तिला कदाचित एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत भांडताना पाहिलेले असते आणि तिच्याबद्दल असा समाज करून घेतलेला असतो की ती भांडकुदळ आहे, पण जे सत्य नसते. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना आपण असाच हा रंगीत काचेचा चष्मा आपल्या डोळ्याना लावतो किंवा रंगीत काचेच्या खिडकीतून पाहतो, अगदी आपापल्या सोयीनुसार आणि गोष्टी पाहतो आणि अनुभवतो. हे एक प्रकारे असत्य जगणेच नव्हे का? आपण आपापल्या सोयीनुसार रंग निवडतो आणि जगाकडे पाहतो, मतं बनवतो, अंदाज बांधतो. हे अगदीच अहिताचं आहे. अशा सवयीमुळे आपण काडीचा आपल्या आजूबाजूच्या माणसांचे, घटनांचे, वस्तूंचे खरे रंग, खर्या छटा पाहू शकणार नाही आणि सदैव अंधकारात राहू. अशा विचित्र सवयीमुळे आपण सतत सत्यापासून लांब राहू.
जन्माला येताना जी मनाची कोरी पाटी आपण आपल्यासोबत घेऊन आलेलो असतो त्या पाटीवर आपण आपापले अनुभव लिहीत जातो आणि सामाजिक संस्कारांच्या प्रभावाने जसजसे हे अनुभव 'रचले' जातात तसतस आपलं वैचारिक आणि भावनिक विश्व तयार होत जात. उदाहरणार्थ, समजा एक शाळकरी मुलगा आहे, सुमीत. शाळेत सुमीतच्या बाजूला एक विकास नावाचा मुलगा बसतो ज्याची आर्थिक परिस्थिती समजा हालाखीची आहे. विकास सुमितकडून कधीकधी पेन्सिल किंवा पेन उसना घेतो आणि परत करायला खरोखर विसरतो. तर सुमीतच्या मनात असा विचार तग धरू लागतो की हालाखीच्या परिस्थितीत वाढलेली मुलं ही अशीच असतात, 'वस्तू घेऊन त्या परत न करणारी'. हा विचार सुमीतच्या मनात रुजू लागतो आणि भविष्यात त्याच्या आयुष्यात येणाऱ्या हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या प्रत्येक व्यक्तीशी तो अशाच मानसिकतेतून वागत असतो की 'ही व्यक्ती घेतलेली वस्तू परत करणार नाही'. सुमितने त्याच्या डोळ्यावर चढवलेला हा पूर्वग्रहदूषित रंगीत चष्माच नव्हे का किंवा विकासकडे रंगीत काचेच्या खिडकीतून पाहणेच नव्हे का? कशावरून हलाखीच्या परिस्थितीत वाढलेली सर्वच माणसे 'अशी' असतील? आणि मुळात हा विचारच ज्या अनुभवावर आधारित आहे तो अनुभव आणि त्याच अर्थनिर्णयन तरी खर आहे का? विकास हा खरोखरीच पेन्सिल किंवा पेन परत करण्यास विसरत होता, मुद्दामून नव्हे. प्रसंगाचा हा कंगोरा सुमितने सोयीस्कररीत्या दुर्लक्षिला आणि विकासाला लेबल लावलं. हे रंगीत काचेच्या खिडकीतून पाहणे नव्हे का?
आपण आपापलया आयुष्यात असेच रंगीत चष्मे आपापल्या सोयीनुसार चढवत असतो, रंगीत काचेच्या खिडकीतून पाहात असतो, कोठलाही पुढचा मागचा विचार न करता, परिस्थिती समजून न घेता. असे रंगीत चष्मे चढवल्यामुळेच संकुचित मान्यप्रतिमा तयार होतात आणि नातेसंबंधात ताणतणाव निर्माण करतात. याच रंगीत चष्म्यांनी आणि खिडक्यांनी आतापर्यंत अनेक आयुष्याचं नुकसान केलं आहे त्यामुळे असे हे रंगीत चष्मे आपण आपल्या डोळ्यातून उतारावायलाच हवेत. ह्या रंगीत काचेच्या खिडक्यांपासून लांब जायलाच हवे. नाही का?
काळजी घ्या.
दीप्ती शा. आ. शिंदे

Comments
Post a Comment