Posts

Showing posts from August 17, 2014

विसंगतता

विसंगतता  संध्याकाळची  साधारण आठ - साडे आठची वेळ असावी . मी ऑफिसमधून घरी येत होते . ट्रेनचा प्रवास. सांताक्रुजपासून चौथ्या स्टेशनवर  - जोगेश्वरीला उतरायचं म्हणून मी दरवाज्यापाशीच उभी होते . काळोखामुळे बाहेरच बऱ्यापैकी स्पष्ट दिसत नसतानाही मी मस्त हवा खात बाहेर न्याहाळत होते . विले पार्ले स्टेशनला दोन मुली चढल्या आणि त्यांच्याबरोबर तीन लहान मुले होती . लहान म्हणजे असतील पाचवी सातवीतील. त्या लहान मुलांपैकी दोन मुले होती आणि एक मुलगी होती. असा पाच जणांचा समूह होता तो .  मोठ्या मुलींमधील एक मुलगी - एक 'ताई' डब्ब्याच्या लोखंडी दांड्याजवळ आली आणि त्याला खिळून उभी राहिली .  भुरभुरणारे केस सावरत , वाऱ्याच्या पाठीवर स्वैर झालेल्या, आपल्या उजव्या खांद्यावरील ओढणी सावरत ती उभी होती . दुसरी 'ताई' माझ्या अगदी समोर उभी होती . त्यां तीन लहान मुलांपैकी एक मुलगा हे सगळ पाहता होता आणि  मीही .   आपली ताई लोखंडी दांड्याला धरून उभी राहून बाहेरची जलद गतीने धावणारी दृश्य पहातेय , छान हवा खातेय , हे पाहून तो लहान मुलगाही पुढे जाउ लागला . हा छोटू पुढे येतोय हे पहाताच ती 'ता