Posts

Showing posts from February 24, 2019

आनंदी गोपाळ - एक संस्कारमय अनुभव

आनंदी गोपाळ - एक संस्कारमय अनुभव मी 'आनंदी गोपाळ' पहावा, असं मला खूप जणांनी सुचवलं होतं. आणि आज मी 'आनंदी गोपाळ' पाहिला. आणि अजूनही मी भारावलेल्या अवस्थेत आहे. चित्रपट पाहताना बरेच विचार मनात घुमत होते असं म्हणणं जरा अतिशयोक्ती ठरेल कारण चित्रपटाचा प्रभावच इतका आहे की चित्रपट पाहताना आपण कोठल्याही विचारचक्रात गुंग व्हावं अशी आपल्याला तो परवानगीच देत नाही पण चित्रपट पाहताना दाटून येतात त्या अनेकविध भावना. तत्कालात स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरणारे गोपाळराव आणि त्यांचं स्वप्न मनाशी बाळगून ते फुलवणार्या, आधी त्यांच्यासाठी आणि मग स्वतःसाठी व देशासाठी, आनंदीबाई. त्यांची ही स्फूर्तिदायक कथा पाहताना ह्या जोडप्याबद्दल मनात अभिमानाच्या अनेक लाटा उसळून गेल्या, ज्या अद्याप थांबलेल्या नाहीत. आनंदीबाई म्हणजे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, हे मला ठाऊक होतं पण ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी गोपाळराव आणि आनंदीबाईंना किती संघर्ष करावा लागला, अंतर्गत आणि बहिर्गत पातळीवर, याची अतिशय समर्पक आणि सुयोग्य प्रकारे जाणीव आज झाली. 'आनंदी गोपाळ' हा केवळ चित्रपट नसून तो एक संस्कारपट आहे कारण

माझी मायबोली

'भाषा' फक्त व्यवहाराचे माध्यम नसतात. त्या संस्कृतीच्या वाहकही असतात, असं मला मनोमन वाटतं. आपली संस्कृती जेवढी समृद्ध तेवढी आपली भाषा समृद्ध आणि जेवढी आपली भाषा समृद्ध तेवढी आपली संस्कृती समृद्ध, असं मला एक वर्तुळाकार समीकरणच वाटतं. आणि याच समीकरणाच्या आधारावर मला हे म्हणताना अतिशय आनंद होतो, माझी मायबोली- माझी मराठी ही भाषा आणि संस्कृती म्हणून समृद्ध आहे. मराठीचा मुद्दा हा माझ्यासाठी प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, ऋणानुबंधांचा, अस्मितेचा, संस्कृतीचा, अभिमानाचा आणि आनंदाचा मुद्दा आहे. माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी भाषेतून झालं. नाही म्हणायला माझं आठवीपासून सेमी इंग्रजी माध्यम होतं. पण ईश्वरी कृपेने मला शाळेत आणि महाविद्यालयात खूप चांगले शिक्षक आणि प्राध्यापक मिळाले आणि ज्यांच्यामुळे मी आज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतून संवाद साधू शकते. मीच काय, माझ्या परिचयात असे अनेकजण आहेत की ज्यांचं मराठीतून शालेय शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आज ते इंग्रजीतून उत्तम संवाद साधू शकतात. त्यामुळे, मराठीतून शिकून आमच्या मुलांचं काय भवितव्य, असा प्रश्न विचारणाऱ्या पालकांना काय म्हणावं हे मला