Posts

Showing posts from January 20, 2019

स्वातंत्र्य आणि कर्तव्य...

आज प्रजासत्ताक दिन. या निमित्ताने माझ्या परिसरात झेंडावंदन झालं. यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी आपापले विचार मांडले, लहान लहान गोष्टींतून आपण देशसेवा कशी करू शकतो, ह्यावर प्रकाशझोत टाकला. ह्याच विचारांवर थोडसं मंथन करावसं वाटलं म्हणून हा लेख. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण सोशन मीडीयावर एकमेकांना भरभरून शुभेच्छा देतो. आपल्यापैकी बरेचजण झेंडावंदनही करतात. पण तिथे आपलं आपल्या देशाप्रतीचं कर्तव्य संपतं का? खरं तर तिथे आपल्या कर्तव्यांची सुरुवात होते. मला कधीकधी काहीकाही प्रश्न पडतात जसे की - आपल्यापैकी प्रत्येकजण मतदान करतो? आपल्यापैकी प्रत्येकजण वीज वाचवतो? सार्वजनिक वाहनांतून उतरताना आपण पंखे बंद करतो? प्रत्येकवेळी तिकीट काढून प्रवास करतो? सार्वजनिक नियमांचं पालन करतो? आपापली कामं कर्तव्यदक्षतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतो? या आणि अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं जर 'हो' म्हणून मिळाली तर अभिनंदन, 'हजारो प्राणांच्या बलिदानाने मिळालेलं  स्वातंत्र्य अनुभवण्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला अधिकार आहे'. आजही देशाच्या संरक्षणासाठी अनेक जवान शत्रूपासून सीमेचं रक्षण