Posts

Showing posts from August 13, 2017

गुहा...

त्या तिथे पलीकडे एक गुहा आहे  हो, एक गुहा आहे  आणि मला तिथे जाण्याची इच्छा आहे  सुरू केला मी प्रवास एका असीम आणि अनामिक इच्छेपायी  एका नावेत बसले मी  संततधार पावसात मृदू हेलकावे खात ती नाव पल्याड पोहोचली  मी उतरले  अनवाणी पायांना माझ्या तेथील खडीयुक्त  मातीचा  स्पर्श झाला  मी चालू लागले थोडे अंतर चालताच मी अरण्यात प्रवेश केल्याचं उमगलं  धास्ती वाटली काहीशी  पण इच्छा प्रबळ होती, गुहेत पोहोचण्याची  त्या इच्छेच्या जोरावर मी चालत राहिले  आजूबाजूला गर्द झाडी होती  पायाला खडी टोचत होत्या  एक काटाही रूपला  पण मी चालत राहिले  गुहा अजून काहीशा अंतरावरच होती  मी ध्येयपीसाट होऊन चालत होते  आणि अचानक,  अचानक समोर एक सर्प दिसला  काळाकुट्ट,लांब...  त्याला पाहताक्षणीच मी थंड पडले, क्षणभर घाबरले  पण  त्याच माझ्याकडे लक्ष नसाव कदाचित  एक कोठल्यातरी अवर्णनीय आणि अगम्य तंद्रीत तो पुढे गेला, फुत्कारत...  मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि पुढे चालू लागले  कानावर काही अनोळखी आवाज पडत होते  अरण्यातील हिंस्र श्वापदांचे असावेत  मी कानाडोळा केला आणि पुढेच जात राहिले  आणि ठराविक अंतरानंत