Posts

Showing posts from August 4, 2019

Purpose...

Sometimes people wonder, what is the purpose of their life, why have they come on this earth, what their life is made for... I won't be surprised at all, if you say that you are also one of them. No worries. This question walks through everyone's mind at least once in their life. Some people happen to ask this question early in their life, some ask later in their life. It doesn't make any difference until and unless you get the correct, to be precise, the satisfactory answer.  You have whole right to be confused for some time or even longer time. But you have no right to be there forever. Remember, the purpose of your life and your chosen career may not go hand in hand, seemingly. But believe me, everything is connected at the end. Currently in your life (education, career, personal or social relationships etc.), perhaps you are  doing something by looking at which others might be feeling - what is s/he doing? But trust me, if you are clear with your goal, if you are capa

A true guide!...

तुम्ही कसेही वागा. तुमच्या प्रत्येक वागण्याचं मूल्यमापन, परीक्षण हे होतच. तुमच्या एखाद्या वागण्याला काही लोक बरोबर म्हणतील आणि त्याच वागण्याला काही लोक चुकीचंही म्हणतील... पण त्यांच्या ह्या मूल्यमापनावरून तुमचं वागणं चूक किंवा बरोबर कधीच ठरत नसतं. तुमचं वागणं चूक होतं की बरोबर हे ठरविण्याचा अंतिम निर्णय सर्वस्वी तुमचाच असतो आणि असला पाहिजे. फक्त तो घेताना तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीचा आधार घेतला पाहिजे, इतकंच... पण बऱ्याचदा बऱ्याच लोकांना समजत नाही की आपली बुद्धी म्हणजे काय. खरं आहे! आपली बुद्धी कोणती? ती आपल्याला कोठून येते? ती आपल्याला कोण देतं? आपले पालक? नातेवाईक? शिक्षक व इतर गुरुजन? मित्र? प्रसारमाध्यमं? का अजून कोणी? का एकंदरच हा सर्व समाज? आणि कसा? कितपत? का? कधी?,  हा गहन विषय आहे. काहीजण त्यांच्या जाणते अजाणतेपणी त्यांचे आई-वडील त्यांना जे सांगतात तेच करतात. काहीजण त्यांचा मित्रपरिवार त्यांना जे सांगतो तेच करतात. काहीजण त्यांचे शिक्षक किंवा इतर गुरुजन जे सांगतात तेच करतात. अर्थात कोणाचं ऐकणं हे गैर आहे, असं माझं म्हणणंच नाही. पण मग आपण जे आतला आवाज, आपली बुद्धी, आपलं म