Posts

Showing posts from December 31, 2017

शिकूया मिळून सार्याजणी...

आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जवळजवळ सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. आज तिने यशाची बव्हंशी क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. पण अशा किती स्त्रिया आहेत? अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोग्या... स्त्री शिक्षणाचे आणि सक्षमीकरणाचे वारे अजूनही फक्त मुंबई, पुण्यासार्ख्याच कॉस्मॉपॉलिटन शहरांत वाहत आहेत. खेड्यातील स्त्री आजही अशिक्षित आहे... खेड तर दूर पण शहरान्मधीलही बर्याच स्त्रिया अजूनही रुढी, परंपरांच्या बंधनात अडकलेल्या आहेत. त्याच्यातून त्यानी स्वतःची सुटका करून घेण खूप गरजेच आहे. आजही कित्येक मुलीना शिक्षण मिळत नाही. त्याना शिक्षणाच्या त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहाव लागत. कित्येक मुलींची कोवळ्या वयात आजही लग्न होतात. पर्यायाने जबाबदाऱ्या लवकर अंगावर पडतात आणि वैयक्तिक विकास खुंटतो. आणि भारतीय स्त्रियांची जडणघडणही अशी काय चतुराईने केली जाते की त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येतेय हे त्यांच त्यानासुद्धा कळत नाही आणि कळल तर वाईट वाटत नाही. उलट आपण आपल्या घर संसारासाठी त्याग करतोय आणि हे पुण्यकर्म आहे अशी मानसिकता त्यांच्यात रुजवली गेलेली असते. एवढ लांब कशाला जा? अगदी आम्ह