Posts

Showing posts from April 15, 2018

तुम्हाला कोण व्हायचंय?

 आपल्यापैकी प्रत्येलाला लहानपणी अशी विचारणा झालेली असते की तुला मोठेपणी काय किंवा कोण व्हायचंय. आणि आपल्यापैकी प्रत्येकानेही आपापल्या परीने या प्रश्नाच उत्तर दिलेलं असतं." मला डॉक्टर व्हायचंय","मला इंजिनीअर व्हायचंय"," मला शिक्षक व्हायचंय" या रूढीपरंपरेने चालत आलेल्या विधानांमध्ये कधीकधी "मला अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय","मला पायलट व्हायचंय" अशीही विधानं चमकून जातात. डॉक्टर म्हणजे काय, इंजिनीअर म्हणजे काय किंवा इतरही अमुक अमुक म्हणजे काय हे पूर्णपणे माहीत नसतानाही एवढ्या लहान वयात आपल्याला असं कसं वाटतं की मला अमुक अमुक व्हायचंय? उत्तर तसं सोपं आहे. आपण हे सगळं निरीक्षणातून शिकतो. आपल्याला माहित असलेल्यांपैकी कोणीतरी डॉक्टर असतं, कोणीतरी इंजिनीअर असतं, कोणीतरी माधुरी किंवा दीपिकाचे डान्स परफॉर्मन्सेस पाहिलेले असतात. भलेही आपल्याला नेमकं कळत नसलं की ही माणसं काय करतात पण आपल्याला त्यांच्यामधील काहीतरी भावलेलं असतं. अर्थात आता आपल्याला काय भावतं किंवा भावावं हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं. इथे मी 'संस्कार' हा शब्द आपल्या घराती