Posts

Showing posts from June 25, 2017

दुःखा दुःखा तुझे कारण तरी काय?

'सुखाचा शोध' घेत बसणं ही मानवी परंपरा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. प्रत्येक माणसाला सुख हवय. सुखापेक्षा अधिक चिरकाळ टिकणारा आनंद हवाय. प्रत्येक माणूस त्यासाठी धडपडतोय मग तरीही माणसे दुखी का आहेत. अशाच विचारांनी भारावलेल्या एका अस्वस्थ संध्याकाळी मी खिडकीत बसून होते. तेव्हा विचार आणि भावविश्वात उमटलेले हे तरंग... माणूस दुखी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे वाटत की तो स्वतःपासून तुटलाय.  जागतिकीकरणामुळे जग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक जवळ आलय पण माणसे आपल्या आप्तांपासून आणि मुळात स्वतः पासून दूर चालली आहेत. आज माणसाला आपल्या माणसांशी बोलायलाच वेळ नाहीये आणि अतीव दुःखाची आणि खेदाची बाब ही आहे की त्यांना स्वतः शीही बोलायला वेळ नाही.  आपण आपल्या विचारांवर आणि भावनांवर विचार करतच नाही कदाचित आजकाल. आपल्याला वेळच कोठे असतो म्हणा. एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला राग आला, वाईट वाटलं तर आपण त्यावर विचार करत नाही. आपण आजकाल त्या विचारांच्या आणि भावनांच्या मुळाशी , खोलात जात नाही. आपण त्या सर्व बाबींचा वरवर उथळ विचार करतो आणि परिस्थितीला व माणसांना लेबल्स लावून मोक