A true guide!...

तुम्ही कसेही वागा. तुमच्या प्रत्येक वागण्याचं मूल्यमापन, परीक्षण हे होतच. तुमच्या एखाद्या वागण्याला काही लोक बरोबर म्हणतील आणि त्याच वागण्याला काही लोक चुकीचंही म्हणतील... पण त्यांच्या ह्या मूल्यमापनावरून तुमचं वागणं चूक किंवा बरोबर कधीच ठरत नसतं. तुमचं वागणं चूक होतं की बरोबर हे ठरविण्याचा अंतिम निर्णय सर्वस्वी तुमचाच असतो आणि असला पाहिजे. फक्त तो घेताना तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीचा आधार घेतला पाहिजे, इतकंच...

पण बऱ्याचदा बऱ्याच लोकांना समजत नाही की आपली बुद्धी म्हणजे काय. खरं आहे! आपली बुद्धी कोणती? ती आपल्याला कोठून येते? ती आपल्याला कोण देतं? आपले पालक? नातेवाईक? शिक्षक व इतर गुरुजन? मित्र? प्रसारमाध्यमं? का अजून कोणी? का एकंदरच हा सर्व समाज? आणि कसा? कितपत? का? कधी?,  हा गहन विषय आहे.

काहीजण त्यांच्या जाणते अजाणतेपणी त्यांचे आई-वडील त्यांना जे सांगतात तेच करतात. काहीजण त्यांचा मित्रपरिवार त्यांना जे सांगतो तेच करतात. काहीजण त्यांचे शिक्षक किंवा इतर गुरुजन जे सांगतात तेच करतात. अर्थात कोणाचं ऐकणं हे गैर आहे, असं माझं म्हणणंच नाही. पण मग आपण जे आतला आवाज, आपली बुद्धी, आपलं मन हे जे काही म्हणतो ते नेमकं असतं तरी काय, असा प्रश्न जर कोणाला पडत असेल तर साहजिक आहे.

मला असं वाटतं उपरोल्लेखित सर्व घटकांच्याही पलीकडे एक 'आंतरिक आवाज' नावाचा एक अमूल्य घटक असतो, inner calling, I mean. हा जर प्रत्येकाचा प्रत्येकाला ओळखता आला तर आयुष्य नक्की सुकर होतं. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा आपण आपल्या मनाचा कौल मान्य केलेला असतो तेव्हा आपल्याला मनात एक वेगळीच शांतता जाणवते, मनात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते, आणि आत्मविश्वासही जाणवतो. तुमच्या आत काहीतरी असतं जे सतत तुम्हाला मार्ग दाखवत असतं, तुम्हाला काहीतरी सांगत असतं. त्याला तुम्ही देव म्हणा, निसर्ग म्हणा, अंतरात्मा म्हणा, guiding angel म्हणा किंवा अजून काही म्हणा. तुमच्यासोबत कोणीतरी सतत असतं जे तुम्हाला मार्गदर्शन करत असतं. 'ह्या' शक्तीचं आपण ऐकलं पाहिजे, असं मला वाटतं.

तुम्ही स्वतःचं करू पाहत असलेलं मूल्यमापन, घेऊ पाहत असलेला निर्णय, बनवू पाहत असलेलं एखादं मत हे सगळं ह्या आंतरिक शक्तीच्या आधारावर असायला हवं. Then only you will have clearer path, clearer goals, clearer and pure vision, clearer and pure mission and clearer and pure life.

- दिप्ती शा. आ. शिंदे

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"