Posts

स्वातंत्र्य आणि कर्तव्य...

आज प्रजासत्ताक दिन. या निमित्ताने माझ्या परिसरात झेंडावंदन झालं. यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी आपापले विचार मांडले, लहान लहान गोष्टींतून आपण देशसेवा कशी करू शकतो, ह्य...

10 years Challenge

Visited Social Media just some time back and saw people taking 10 years challenge. They are also nominating others to take up this challenge. I started thinking - Do I have any photo of 10 years back? And the answer came - No. But the thought train didn't stop there. I started thinking - How was I 10 yeas back? What is my mental photo of 10 years back? (as ultimately photo depicts you the way you are or portray!) And the memories travelled across my mind. 10 years back i.e. around 2009, I was in Ruparel, pursuing my SYBA degree. I was very active in extra-curricular activities also. I was full of energy and enthusiasm.  People who have been knowing me since really long time would surely second me. (I know!) I have so many happy memories around this year like winning many Elocution competitions, excelling in academics, working as freelancer writer and so on. And now when I look back at 2009, I really  smile. My college days give me many rays of hopes, brightness, happines...

"तीळगुळ घ्या,गोड गोड बोला..."

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आपण नेहमी "तीळगुळ घ्या, गोड गोड बोला", असं म्हणतो. पण आपण नेहमी गोड बोलतो का? आणि गोड बोलणं म्हणजे नेमकं काय? यावर थोडसा विचार करावासा वाटल...

I feel this. What about you?

Have you ever found yourself being in the same irritating/frustrating situation, meeting same irritating people again and again? Yes? Oh okay. Let me tell you, you are not alone. But then have you ever thought about it? Have you ever taken out some time to ponder about the same? No? Please do so. Very recently, recently means today evening only, I just asked this question to myself, unconsciously or to be specific, subconsciously and an answer emerged.  I felt, I am being put in similar situations, meeting certain type of people again and again to learn something which perhaps I am not learning successfully. I don't know who gave me this answer. Have I read it anywhere? Have I have heard it anywhere? Did my collective conscious told me this? Did one of the books on Past life and related parapsychology knowledge, which I have read, provided me this answer? I simply don't know. I strongly believe, we have come here to learn something and to unlearn something. To take it littl...

शिदोरी

हा हा म्हणता २०१८ संपलंही. २०१८ चा आज शेवटचा दिवस. उद्यापासून २०१९ साल सुरू होणार.  या नवीन वर्षाच्या सर्वांना सर्वात आधी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. येणारं हे साल आपणा सर्वांना सुख, समृद्धी, आनंद, सुयश, प्रेम, शारीरिक-मानसिक-बौद्धिक-भावनिक-अध्यात्मिक-आर्थिक संपन्नतेचं जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.  आज अगदी सकाळपासूनच सोशल मीडियावर नवीनवर्षाभिनंदनाचे मेसेजेस फिरत आहेत. सर्वच जण २०१८ च्या गोड-कटू सर्वच आठवणींना उजाळा देत आहेत. माझ्याही मनात २०१८ चा फ्लॅशबॅक तरळून गेलाच. मी खूप काही पाहिलं, अनुभवलं आणि शिकले.  आपण प्रत्येकच जण आपापल्या आयुष्यात काहीनाकाहीतरी नेहमी शिकत असतो. मलाही या वर्षात बरंच काही शिकायला मिळालं. त्यातलेच काही अनुभव मला थोडक्यात मांडायचे आहेत.  खरं तर, प्रेम-देव-कर्म या सर्वांवरच माझा लहानपणापासून विश्वास आहेच. माझ्या घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्र-मैत्रिणींनी आणि एकूणच माझ्या वातावरणाने मला जे काही घडवलं आहे त्यामुळे प्रेम-देव-कर्म या तिन्हींवर माझा आधीपासूनच दृढ विश्वास आहे. पण या वर्षात मला या तिन्ही शक्तीचं सामर्थ्य नव्याने अनुभवायला...

घेशील ना माझी काळजी?

"हॅलो,  कसा आहेस?  खूप दिवस झाले,  तुझ्याशी  बोलणं नाही झालं माझं. म्हणून आज मुद्दाम पत्र लिहायला घेतलंय. तुझ्याशी  बोलण्याचा खूप दिवस माझा प्रयत्न चालू आहे पण तू व्यस्त आहेस,तुझ्या रोजच्या धावपळीत. आणि  तुझ्या दगदगीच्या आयुष्यात असं तुला डिस्टर्ब करणंही मला पटत नाही. खरं तर खूप बोलायचं आहे, सांगायचं आहे मला तुला. पण कसं सांगावं, काय सांगावं आणि किती सांगावं हेच उमजत नाहीये. बऱ्याच दिवसांनी एखाद्याशी बोलायला गेल्यावर कधीकधी आपले आपल्यालाच शब्द सापडत नाहीत, तसंच काहीसं माझं झालंय. तसा तू काही मला परका नाहीस...  पण... असो...  माझं ना, एक निरीक्षण आहे. तू ना आजकाल मला आधीसारखा - म्हणजे लहानपणी होतास ना - तसा आनंदात दिसत नाहीस रे. तुझ्या चेहऱ्यावर तू कसलंतरी अनामिक ओझं आणि त्रास घेऊन फिरत असतोस. तुझ्या चेहऱ्यावर निखळ आनंद मला दिसतंच नाही हल्ली. सतत कसली ना कसलीतरी भीती, नाहीतर त्रागा, शंका, तक्रारी आदींचा पेहराव असतो तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर.  त्यादिवशी बाजूच्या रमाकांतच्या मुलाच्या परीक्...

When they message this...

Some days back, I had received a photo on What's app conveying a graphical message that God doesn't like it when people forward photos in name of him where they say," If you share this, you will get some good news within XYZ hours/days or "If you don't share this, some bad will happen." I found it so appealing that I had saved that photo in my gallery with an intention to send that to someone who forwards such kinds of messages.  How do you feel, when you get such kinds of messages in name of God? Definitely, you too don't like it,right? Hm, there is nothing to like that. And I am pretty sure that God himself doesn't like such kinds of posts.  Sometime I just wonder what the God must be thinking while seeing his devotees sending such posts.  But why do people forward such kinds of messages? I always have this question on my mind. After pondering over this, the Psychologist inside me gives me the answer (Most probable answer). And the an...