शिदोरी
हा हा म्हणता २०१८ संपलंही. २०१८ चा आज शेवटचा दिवस. उद्यापासून २०१९ साल सुरू होणार. या नवीन वर्षाच्या सर्वांना सर्वात आधी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. येणारं हे साल आपणा सर्वांना सुख, समृद्धी, आनंद, सुयश, प्रेम, शारीरिक-मानसिक-बौद्धिक-भावनिक-अध्यात्मिक-आर्थिक संपन्नतेचं जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज अगदी सकाळपासूनच सोशल मीडियावर नवीनवर्षाभिनंदनाचे मेसेजेस फिरत आहेत. सर्वच जण २०१८ च्या गोड-कटू सर्वच आठवणींना उजाळा देत आहेत. माझ्याही मनात २०१८ चा फ्लॅशबॅक तरळून गेलाच. मी खूप काही पाहिलं, अनुभवलं आणि शिकले. आपण प्रत्येकच जण आपापल्या आयुष्यात काहीनाकाहीतरी नेहमी शिकत असतो. मलाही या वर्षात बरंच काही शिकायला मिळालं. त्यातलेच काही अनुभव मला थोडक्यात मांडायचे आहेत. खरं तर, प्रेम-देव-कर्म या सर्वांवरच माझा लहानपणापासून विश्वास आहेच. माझ्या घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्र-मैत्रिणींनी आणि एकूणच माझ्या वातावरणाने मला जे काही घडवलं आहे त्यामुळे प्रेम-देव-कर्म या तिन्हींवर माझा आधीपासूनच दृढ विश्वास आहे. पण या वर्षात मला या तिन्ही शक्तीचं सामर्थ्य नव्याने अनुभवायला...